ओटवणे / प्रतिनिधी:
वंचित बहुजन आघाडीच्या सावंतवाडी शाखा आणि सावंतवाडी येथील ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या मदतीच्या आवाहनाला दात्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या आवाहनातून गोळा झालेल्या जीवनावश्यक वस्तूंचे गुरुवारी पूरग्रस्तांना वितरण करण्यात येणार आहे.
पूराग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या या आवाहनाला समाजाच्या आपुलकीच्या भावनेने दर्शन घडत आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सावंतवाडी तालुका महासचिव संदीप जाधव, सावंतवाडी शहर प्रमुख, प्रदीप कांबळे, मालवण तालुका अध्यक्ष अक्षय कदम, तसेच ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश वाडकर, खजिनदार प्रशांत पाटणकर, टीम लीडर शाहरुख खलील खान यांनी नियोजन केले आहे.