भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारिया कुटुंबीयाला हरिद्वार काही लोकांकडून जातीवाचक टीकेला तोंड द्यावे लागले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला गेल्या बुधवारी झालेल्या अर्जेंटिनाविरूद्धच्या उपांत्य सामन्यात हार पत्करावी लागली होती. या पराभवानंतर हरिद्वारमध्ये स्थायिक असलेल्या कटारिया कुटुंबीय सदस्यांवर शेजाऱयांकडून जातीवाचक टीका करण्यात आली होती.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत वंदनाने चार गोल नोंदवित दर्जेदार कामगिरी केली आहे. भारतामध्ये अद्याप जातीवाचक टीका टिपणी केल्या जातात ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे कर्णधार राणी ामपालने म्हटले आहे. या संघामध्ये विविध राज्यातील विविध जाती धर्माच्या खेळाडूंचा समावेश असून आम्ही देशाचे प्रतिनिधीतव करीत असताना कोणताही भेदभाव मानत नाही. दरम्यान या ऑलिपिक स्पर्धेत आम्हाला पदक मिळविता आले नसले तरी देशातील असंख्य लोकांकडून प्रोत्साहन मिळाले, असेही राणी रामपालने म्हटले आहे. वंदना कटारिया चे वास्तव्य हरिद्वारमध्ये आहे. बुधवारच्या सामन्यातील पराभवानंतर वंदनाच्या हरिद्वारमधील निवासस्थानासमोर काही विध्नसंतोषी व्यक्तींनी फटोक फोडून नृत्य करत आनंद व्यक्त केला. दरम्यान भारतीय संघामध्ये दलित खेळाडूंचा समावेश अधिक प्रमाणात केल्याने पराभव झाला अशी टिपण त्या व्यक्तींनी केली. 29 वर्षीय वंदनाने ऑलिंपिक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविली होती.