ऍड. दिनेश पाटील यांना केवळ अध्यक्ष म्हणून काम करता येणार नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
बार असोसिएशन अध्यक्षपदी दिनेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्या विरोधात सी. टी. मजगी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. द्वितीय खंडपीठाने केवळ दिनेश पाटील यांना अध्यक्षपदाचा कारभार हाताळण्यास मनाई केली आहे, असा निकाल दिला आहे. बार असोसिएशन सोसायटी संघ असल्यामुळे न्यायालयाला न्याय द्यायचा अधिकार नाही, असे दिनेश पाटील यांनी न्यायालयासमोर म्हणणे मांडले होते.
ऍड. सी. टी. मजगी यांनी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी जो ठराव मांडला होता त्याला मनाई मागितली होती. मात्र, त्याला एकसदस्यीय खंडपीठ व द्विसदस्यीय खंडपीठाने मनाई दिली नाही. त्यामुळे तो ठराव अजूनही वैध की अवैध याच्याबद्दल न्याय होणे बाकी आहे.