प्रतिनिधी / बेळगाव
वकिलांना तातडीने दुसरा डोस द्यावा, अशी मागणी बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने दुसरा डोस उपलब्ध करुन गुरूवारी 110 हून अधिक वकिलांना याचा लाभ घेता आला. त्यामुळे वकीलवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाल्यामुळे वकिलांना लसीकरण करणे गरजेचे आहे. वकील अनेकांच्या संपर्कात येवू शकतात. पक्षकार तसेच साक्षीदार यांच्याशी चर्चा करणे महत्वाचे असते. त्यामुळे वारंवार ते इतरांच्या संपर्कात येत असून लसीकरणाची नितांत गरज होती. पहिला डोस देण्यात आल्यानंतर दुसरा डोस तातडीने द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
गेल्या महिन्याभरापासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य विनय मांगलेकर, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, सदस्य कमलेश मायाण्णाचे, ऍड. पी. के. पवार, नितीन गंगाई, ज्ये÷ वकील डी. एम. पाटील, ऍड. सचिन शिवण्णावर, ऍड. अमृत कोल्हटकर यांच्यासह इतर वकिलांनी यासाठी प्रयत्न केले.