बुधवारी सायंकाळपर्यंत करा ऑनलाईन नोंदणी
बेळगाव : वकील व त्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने गुरुवारी मेगा लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तरी राज्यभरातील सर्व वकिलांनी बुधवारी सायंकाळपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कर्नाटक राज्य बार असोसिएशनने केले आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 18 वर्षे वयोगटावरील सर्वांना ही लस दिली जाणार आहे. हा पहिला डोस असणार असून प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे. वकिलांबरोबरच त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांची नावे नोंदवावीत आणि संबंधित बार असोसिएशनच्या समुदाय भवनमध्ये जाऊन ही लस घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.