दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ-मराठी विद्यानिकेतनतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व मराठी विद्यानिकेतन यांच्यावतीने महात्मा फुले पुण्यतिथी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा गुरुवारी पार पडल्या. दि. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बेळगाव ग्रामीण व शहर परिसरातील 70 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन परीक्षक शैलजा मत्तीकोप व प्रा. सुरेश पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक इंद्रजित मोरे व गजानन सावंत उपस्थित होते.
स्पर्धेसाठी महात्मा फुलेंचे शेतीविषयक विचार व सध्याचे शेतकरी आंदोलन तसेच कोरोना व शिक्षण व्यवस्था हे विषय देण्यात आले होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – 1) अथर्व निवृत्ती गुरव (मराठी विद्यानिकेतन), 2) कुणाल मनोहर पाटील (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, केदनूर), 3) सायली भरमा तुपारे (मराठी विद्यानिकेतन), उत्तेजनार्थ-नमिता मारुती येळ्ळूरकर (संत तुकाराम विद्यालय, सुंडी), श्रद्धा गणपती पाटील (बालिका आदर्श विद्यालय), श्रद्धा दत्तात्रय देसाई (स्वामी विवेकानंद हायस्कूल, उचगाव), मानसी कृष्णा देसाई (स्वामी विवेकानंद हायस्कूल, उचगाव), ऋग्वेद तुकाराम बेळगावकर (सरस्वती हायस्कूल, हंदिगनूर).
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. 28 नोव्हेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन येथे होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रसाद सावंत, सीमा कंग्राळकर, स्वाती जाधव, रुपाली बांदिवडेकर, रेणू सुळकर, जयश्री पाटील, संज्योत बांदेकर, भारती शिराळे यांनी परिश्रम घेतले.