उत्सवाच्या दिनी पर्यावरणाचा मंत्र जपण्याचा दिला संदेश
वाळपई / प्रतिनिधी
पतिव्रतूच्या सौभाग्याचे देणे असलेला पारंपारिक वटपौर्णिमाच्या उत्सव सत्तरी तालुक्मयात पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे सध्या कोरोनाचा विषाणू मोठय़ा प्रमाणात फैलावत असल्यामुळे सतर्कता बाळगीत अनेक महिला भगिनी सामाजिक अंतर राखून हा उत्सव साजरा करण्यावर भर दिला तर बऱयाच गावातील महिला भगिनी वेगळय़ा प्रकारे हा उत्सव साजरा करीत असताना आज जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने झाडांची लागवड करून हा उत्सव साजरा करण्यावर भर दिला .
याबाबतची माहिती अशी की सौभाग्यवती महिलाच्या जीवनामध्ये वटपौर्णिमेचा उत्सव हा वेगळय़ा अर्थाने महत्त्वाचा मानला जात असतो. दरवषी हा उत्सव महिला भगिनी पारंपरिक पद्धतीने सादर करीत असतात .यंदा मात्र कोरोना रोगाच्या भीतीमुळे या उत्सवाला वेगळे स्वरूप पाहायला मिळाले .सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये वेगवेगळय़ा पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यावर भर देण्यात आला .बऱयाच महिलांनी हा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला .मात्र सामाजिक अंतराचा फज्जा उडू नये याची विशेष काळजी घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले .बऱयाच महिला भगिनींनी तोंडावर मास्क वापरून वडाच्या झाडाचे पूजा करताना पहावयास मिळाले .सत्तरी तालुक्मयाच्या जवळपास सर्वच गावांमध्ये हे चित्र पहायला मिळाले.
पर्यावरणाचा जपला मंत्र.
महत्त्वाचे म्हणजे आज पर्यावरण दिवस असल्यामुळे पर्यावरणाच्या दिनी महिला भगिनींनी पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून उत्सवाला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. बऱयाच गावातील महिला भगिनी वडाच्या झाडाच्या अनेक फांद्या न तोडता एकच फांदी तोडून त्याची सामुहिक पूजा करण्यावर भर दिला. यामुळे मोठय़ा प्रमाणात वडाच्या झाडाचा विध्वंस न झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे पर्यावरणाचा मंत्र जपण्याचा प्रयत्न महिला भगिनी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
झाडे लावून पर्यावरणीय संदेश.
दरम्यान सत्तरी तालुक्मयातील अनेक गावातील महिला भगिनींनी वेगवेगळय़ा प्रकारची फळे देणाऱया झाडांची लागवड करून पर्यावरणाचा संदेश जपत असतानाच वटपौर्णिमेचा उत्सव वेगळय़ा प्रकारे साजरा करण्यावर भर दिला.गेल्या दोन वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्या नमन सा˜ात या अशाच प्रकारे वटपौर्णिमेचा सण साजरा करीत असतात .यंदाही त्यांनी अशाच प्रकारे लागवड करून वटपौर्णिमेच्या दिवशी समाजाला वेगळय़ा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये अशा प्रकारचा प्रकार पहावयास मिळाला. काही गावांमध्ये वडाच्या झाडांच्या फांद्या न तोडता प्रतीकात्मक पद्धतीने तुळशी वृंदावनाचे पूजन करून या उत्सवाला वेगळय़ा प्रकारचा वाव देताना समाजामध्ये एक वेगळय़ा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र पहावयास मिळाले.