कोरे,आवाडे, महाडिक एकत्र : वारणेत बैठक
वारणानगर / प्रतिनिधी
वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कॉंग्रेस विरोधात पॅनेल करण्यासाठी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे,आमदार प्रकाश आवाडे,माजी आमदार महादेवराव महाडीक,अमल महाडीक यांच्यात मंगळवारी रात्री वारणानगर येथे झालेल्या बैठकीत यड्रावकार, शेट्टी व हाळवणकर यांना सोबत घेवून काँग्रेस विरोधात पॅनेल करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागेसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी वारणानगर येथे आमदार विनय कोरे,आमदार प्रकाश आवाडे ,माजी आमदार महादेवराव महाडीक, अमल महाडीक व हातकणगले तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थीतीत बैठक झाली सुमारे तासभर ही बैठक सुरू होती या बैठकीमध्ये एकत्रित लढण्याचे दृष्टीने मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ,माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी थेट फोनवरून या तीन्ही नेत्यांनी सकारात्मक चर्चा केली या निवडणुकीत सहा गटांनी एकत्रित कॉंग्रेस विरोधात पॅनेल करण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे जागा वाटपाबाबतही चर्चा झाली यामध्ये गटाच्या बलाप्रमाणे जागा वाटपास मान्यता देण्यात आली तसेच निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे नेत्यानी जाहीर केले.
आमदार विनय कोरे यांच्या मध्यस्थीने विधान परिषद निवडणुकीतील महाडीक व पाटील यांच्यातील टोकाचा संघर्ष मिटला होता याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होत असल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या बैठकीस सुरेश पाटील, दिलीप पाटील, विलास खानविलकर,अभय काशमीरे,राजू मगदूम, शहाजी पाटील, उत्तम पाटील,प्रदीप देशमुख,उदयसिंह पाटील, राजवर्थन मोहीते आदी उपस्थीत होते.