प्रतिनिधी / बेळगाव :
वडगावची ग्राम देवता श्री मंगाई देवीची यात्रा दि. 14 जुलै रोजी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. मात्र यावेळी यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय पंचमंडळींनी घेतला आहे. दरवषीप्रमाणे यात्रेनिमित्त देवीला गाऱहाणे घालण्यात येणार आहेत. शुक्रवार दि. 12 जून रोजी रात्री 8 वाजता पाटील गल्ली वडगाव येथील देवीच्या मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने यात्रा साध्या पद्धतीने तसेच यात्रा काळात गर्दी टाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
गुरुवारी मंगाई मंदिर परिसरात पंचमंडळींची बैठक पार पडली. यावेळी शांताराम चव्हाण पाटील यांनी यंदा यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जाणार असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे यात्रा काळात फक्त पारंपरिक विधी केल्या जातील तर वार दिनी केवळ 5 कुमारीकांना घेऊन सामाजिक अंतर राखत परिसरातील (हद्द) देवांना पाणी घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. मात्र यात्रा कोणत्या प्रकारे करावी, याबाबत अंतिम निर्णय पुढील परिस्थिती पाहूनच घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी गाऱहाणे घातल्यानंतर सोमवार दि. 15 पासून देवीच्या हद्दीतील वडगाव परिसरात वार पाळवणुकीला सुरुवात होणार आहे. महिन्याभराच्या कालावधीत एकूण 9 दिवस वार पाळणूक झाल्यानंतर मंगळवार दि. 14 जुलै रोजी मंगाई देवीची यात्रा साजरी करण्यात येणार आहे. दरवषी यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी होत असते. तर किमान आठवडाभर यात्रोत्सव साजरा केला जात असतो. मात्र यंदा कोरोना परिस्थितीमुळे यात्रा काळात गर्दी टाळणे गरजेचे आहे. यामुळेच यावषी ग्राम देवीची यात्रा साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी शशिकांत चव्हाण पाटील, अनंत चव्हाण पाटील, विनायक चव्हाण पाटील, योगेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला मानसिंग चव्हाण पाटील, अमर पाटील, अनिल पाटील, युवराज पाटील, तुषार पाटील, योगेश पाटील, मनोज व्ही. डी., संकेत धामणेकर, आकाश धामणेकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते.