ओंकार कंग्राळकर यांच्या म्हशीने मिळविला प्रथम क्रमांक
प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव येथील शेती सुधारणा मंडळाच्यावतीने मोटरसायकलसोबत म्हैस पळविण्याची शर्यत आयोजित केली होती. या स्पर्धेला अमाप प्रतिसाद मिळाला असून मोठय़ा गटामध्ये ओंकार कंग्राळकर यांच्या म्हशीने प्रथम क्रमांक पटकाविला तर लहान गटामध्ये सिध्देश्वर प्रसन्न काकती यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचे उद्घाटन माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल देसाई व संदीप चव्हाण-पाटील यांनी केले.
या स्पर्धेमध्ये बेळगाव परिसरातील अनेक म्हैस मालकांनी भाग घेतला होता. रविवारी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी दहा बक्षिसे ठेवण्यात आली होती. मोठय़ा गटामध्ये प्रथम क्रमांक ओंकार कंग्राळकर, दुसरा क्रमांक ब्रम्हलिंग प्रसन्न, तृतिय क्रमांक मंगाई देवी प्रसन्न-वडगाव्। त्याचबरोबर नवदीप जाधव-कंग्राळी खुर्द, आकाश गवळी-बेळगाव, मंजुनाथ नाईक-शहापूर, हणमंत बाळेकुंद्री-वडगाव, साहील कडोलकर-वडगाव, अरुण पाटील-सुळगा, अरुण नागनूरकर-वडगाव यांनी बक्षिसे मिळविली.
लहान गटामध्ये सिद्धेश्वर प्रसन्न-काकती प्रथम क्रमांक, महेश जायण्णाचे-धामणे व्दितीय क्रमांक, जगदीश हरिजन-काकती, रेणुका देवी प्रसन्न-अवचारहट्टी, ओंकार कंग्राळकर-वडगाव, प्रथमेश मुतगेकर-नानावाडी, रेणुका देवी प्रसन्न-वडगाव, नवदीप पाटील-कंग्राळी खुर्द, ओंकार महेकर-वडगाव, मंगाई देवी प्रसन्न-वडगाव यांनी अनुक्रमे बक्षिसे मिळविली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष सचिन देसूरकर, उपाध्यक्ष सुशांत तरळेकर, कार्याध्यक्ष रवी कंग्राळकर, रोहीत आजरेकर, सेपेटरी परशराम पाटील, विठ्ठल हलगेकर यांनी परिश्रम घेतले. संदीप हुंदरे, मनोहर हलगेकर, महादेव पाटील, शांताराम चव्हाण-पाटील, सुभाष चव्हाण-पाटील यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली.