प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव येथील 110 केव्ही उपकेंद्रातर्फे दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वडगाव, शहापूर, अनगोळ, भाग्यनगर परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. एफ-4 फिडरमधील भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, आळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, शहापूर, मेगदूत सोसायटी, नाथ पै सर्कल परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
एफ-12 फिडरमधील अनगोळ, विद्यानगर, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, भांदूर गल्ली, संतमीरा स्कूल रोड, अनगोळ-वडगाव रोड, गुलमोहर कॉलनी, समृद्धी कॉलनी, पारिजात कॉलनी, ओंकारनगर, एफ-13 फिडरच्या कार्यक्षेत्रातील भाग्यनगर पहिल्या ते दहाव्या क्रॉसपर्यंत, एफ-14 फिडरच्या कार्यक्षेत्रातील आनंदनगर, संभाजीनगर, केएलई येळ्ळूर रोड, आदर्शनगर, हिंदवाडी, जेल शाळा, फुले गल्ली, अन्नपूर्णेश्वरीनगर, गणेशनगर, एफ-5 फिडर कार्यक्षेत्रातील वडगाव, विणकर कॉलनी, निजामीयानगर, रयत गल्ली, विष्णू गल्ली, एफ-11 फिडरमधील सुभाष मार्केट-हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.