बेळगाव : येळ्ळूर मेन रोड, वडगाव दत्त मंदिर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी माधुरी जाधव, प्रवीण मंडोळकर, सदानंद मासेकर, शुभम दळवी, परशरामभाऊ, महेश मंडोळकर, महेश दंडकर, भारती भोसले, स्मिता मंडोळकर, विशाल शहापूरकर, प्रवीण गोंधळी आदी उपस्थित होते.