शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
यरमाळ रोड, बाळकृष्णनगर, वडगाव येथील एक महिला आपल्या तीन मुलांसह बेपत्ता झाली आहे. यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
सुवर्णा राजू दुदमी (वय 29), मुलगी अक्षता (वय 10), मुलगा विनायक (वय 6), आणखी एक मुलगा आदित्य (वय 4, सर्व रा. यरमाळ रोड, बाळकृष्णनगर, वडगाव) अशी त्यांची नावे आहेत. 5 जानेवारीपासून ते बेपत्ता झाले आहेत. या संबंधी सुवर्णाचा पती राजू याने शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत घरातील कोणालाही न सांगता सुवर्णा आपल्या तीन मुलांसमवेत घराबाहेर पडली आहे. या बेपत्ता महिला व तिच्या मुलांविषयी कोणाला माहिती मिळाल्यास शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.