गृहोपयोगी वस्तू जळून खाक : सुदैवाने जीवितहानी नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
धामणे रोड, वड्डर छावणी, भारतनगर, वडगाव येथील एका घराला बुधवारी पहाटे आग लागली. या आगीत केवळ सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक किमतीचे नुकसान झाले आहे.
वसंत पोटे यांच्या घरी ही घटना घडली आहे. घरातील मंडळी झोपली होती. त्यावेळी शॉर्टसर्किटने छताने पेट घेतला. कौले फुटण्याच्या आवाजाने शेजाऱयांना जाग आली. त्यांनी घरातील मंडळींना बाहेर काढल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचे फवारे मारून आग आटोक्मयात आणणण्यात आली. घराचे छत पूर्णपणे जळले आहे. धान्य, कपडय़ालत्त्यासह गृहोपयोगी साहित्य या आगीत भस्मसात झाले आहे.