प्रतिनिधी /बेळगाव
श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळ (ट्रस्ट) च्यावतीने शनिवार दि. 1 ते शुक्रवार दि. 7 जानेवारी 2022 या दरम्यान ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात होणाऱया या पारायण सोहळय़ात नामवंत हरी भक्तांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत. दररोज पहाटे 5 ते 6.30 वाजता काकडारती, सकाळी 6.30 ते 9.30 यादरम्यान हरिपाठ व श्री ज्ञानेश्वरी पारायण होईल. हभप मारुती सांबरेकर यांच्या अधि÷ानाखाली पारायण सोहळा होणार आहे.
शनिवार दि. 1 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत वडगाव, श्री ज्ञानेश्वर मंदिर येथील श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत हभप गजानन पाटील (निलजी) यांचे प्रवचन, सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत हभप पाटील यांचे कीर्तन होणार आहे.
रविवार दि. 2 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत भारतनगर, तिसरी गल्ली येथील श्रीमाता महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत हभप बसूस्वामी महाराज (देवगणहट्टी) यांचे प्रवचन, सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत हभप मारुती महाराज सांबरेकर (धामणे) यांचे कीर्तन होईल.
सोमवार दि. 3 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत भाग्यनगर, पाचवा क्रॉस, अनगोळ येथील श्री रेणुका महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत हभप संतोष विठ्ठलराव कुष्टे (वडगाव) यांचे प्रवचन, सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत हभप बाळू भक्तीकर (तुरमुरी) यांचे कीर्तन होईल.
मंगळवार दि. 4 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत जिव्हेश्वर मंदिर, वडगाव येथील श्री जिव्हेश्वर महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत हभप मोहन वादवणे (वडगाव) यांचे प्रवचन, सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत हभप विठ्ठल पाटील (किरहलशी-खानापूर) यांचे कीर्तन होईल.
बुधवार दि. 5 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत भारतनगर 5 वी व 6 वी गल्ली येथील संत मुक्ताई महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत हभप भैरू बाळेकुंद्री (धामणे) यांचे प्रवचन, सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत हभप पूर्णानंद काजवे (कोगनोळी) यांचे कीर्तन होईल.
गुरुवार दि. 6 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत बापट गल्ली, बेळगाव येथील भक्ती संस्कृती महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत हभप राजू कावळे (शाहूनगर, बेळगाव) यांचे प्रवचन, सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत हभप बाळकृष्ण मुळे (सांगली) यांचे कीर्तन होईल.
शुक्रवार दि. 7 रोजी सकाळी 10.30 वा. हभप यल्लाप्पा गिरमल (सांबरा) यांचे कालाकीर्तन तर सायं. 5 वा. दिंडी सोहळा होणार आहे. या पारायण सोहळय़ात भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.