रंगांच्या उधळणीसाठी जय्यत तयारी
प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव-शहापूर, जुने बेळगावसह ग्रामीण भागात मंगळवार दि. 22 रोजी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. होळीच्या पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक युवक मंडळांनी रेनडान्सचे आयोजन केले आहे.
बेळगाव शहरात होळीच्या दुसऱया दिवशी रंगोत्सव साजरा होतो. शहरालगतच असणाऱया वडगाव, शहापूर, जुने बेळगाव या भागात पाचव्या दिवशी रंगपंचमी होते. याचसोबत बेळगाव तालुक्मयात रंगपंचमी साजरी होते. रंगांची उधळण करण्यासाठी युवा मंडळी सोमवारपासूनच तयारीला लागली आहे. रंग खरेदी, पिचकारी यासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. रंगपंचमीला डिजे लावला जाणार असल्याने दोन दिवस अगोदरपासून याची जमवाजमव करण्यासाठी तरुणाईची धावपळ सुरू होती.