डिचोली/प्रतिनिधी
गोकुळवाडी साखळी येथे भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया एका फळविपेत्या तरूणीला तिच्या वडिलांनी एका विवाहित तरूणाबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या कारणामुळे केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला. सदर प्रकरण डिचोली पोलिसांनी खून म्हणून नोंद केले असून वडिलांना अटक केली आहे. मयत युवतीचे नाव प्रतिमा सुनिलकुमार रंजन (वय 20) असे असून अटकेत असलेल्या वडिलांचे नाव सुनिलकुमार फौजदार रंजन (वय 46) असे आहे. हे कुटुंब मुळ उत्तर प्रदेश येथील असून साखळीत फळविक्रीचा व्यवसाय करतात.
सदर प्रकरण गुरू. दि. 1 ऑक्टो. रोजी घडले. एका विवाहित तरूणाबरोबर प्रेमसंबंध असल्याने वडिल सुनिलकुमार याने आपल्या मुलीला ताकीद दिली होती. तरीही तिचे प्रेमसंबंध सुरूच असल्याने वडिलांनी तिला क्रिकेटच्या लाकडी स्ट?पने बेदम मारहाण केली. सदर मारहाणीचे व्रण तिच्या संपूर्ण अंगावर उमटले होते. त्याच मुक्मया माराच्या व अंतर्गत जखमांच्या दुखीने तिचा संध्याकाळी साखळी सामाजिक आरोग्य केंद्र इस्पीतळात मृत्यू झाला. त्यामुळे सदर प्रकरण खुनाचे म्हणून नोंदविण्यात आले. याप्रकरणी डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर अधिक तपास करीत आहे.
गोकुळवाडी साखळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोरील दुकानात प्रतिमा आपल्या वडिलांचा फळविक्रीचा व्यवसाय सांभाळत होती. तिचे शेजारीलच एका मोबाईल दुकानावरील एका विवाहित तरूणाशी सूत जुळले. त्यांच्यातील प्रेमसंबंधाची कुणकुण सुनिलकुमार यांना लागल्यानंतर त्याने मुलगी प्रतिमा हिला सदर प्रकरणी बजावले होते. व सदर युवकाचा नाद सोडण्याचा सल्ला दिला होता. तरीही तिचे प्रेमप्रकरण चालूच असल्याने गुरू. दि. 1 रोजी सकाळी वडील सुनिलकुमार याने प्रतिमाला त्याबाबत विचारले असता तिनेही उर्मच भाषा वापरल्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्याचवेळी नाराज बनलेल्या प्रतिमा हिने आपले अजूनही त्या तरूणासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुलीच दिल्याने वडिलांच्या रागाचा पारा चढला. त्याने त्याच रागाने तिला बेदम मारहाण केली.
लाकडी स्ट?म्पने बेदम मारहाण केल्यानंतर प्रतिमा घरातच व्हिवळत होती. व तिच्या अंगावर विविध भागात मोठय़ा प्रमाणात माराचे व्रण उमटले होते. सदर मुक्मया मारामुळे रक्तही गोठवून गेल्याने अंग काळे निळे पडले होते. आपली मुलगी दुखीने व्हिवळत असल्याचे पाहून त्या बापाच्या काळजलाही पाजर फुटली आणि त्याने आपल्या हाताने तिला मलम लावले. परंतु तरीही तिच्या वेदना कमी होत नसल्याने तिला त्याने दुपारी साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून तिला भरती करून घेण्यात आले.
या घटनेची नियमानुसार साखळी पोलीस आउट पोस्टला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी प्रतिमाची जबानी नोंदवली असता, तिने आपल्याला वडिलांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले. सदर जबानी त्यांनी डॉक्टरांच्या समक्ष दिली. त्यावरून पोलिसांनी वडील सुनिलकुमार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
प्रतिमा हिच्या अंगावर उमटलेल्या व्रणांमुळे तसेच अंतर्गत मारामुळे तिला असह्य वेदना होत होत्या. त्यातच तिची प्रकृती संध्याकाळी खालावल्याने तिचा साखळी इस्पीतळातच मृत्यू झाला. त्यामुळे सदर प्रकरण खून म्हणून नोंदविण्यात आले. व त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. गोकुळवाडी येथील त्यांच्या भाडय़ाच्या खोलीचा पंचनामा करण्यात आला. मारहाणीसाठी वापरण्यात आलेली लाकडी स्ट?प पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. अनुजा दाभोलकर यां?नी तक्रार नोंदवली आहे.
याप्रकरणी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्क्रीष्ट प्रसुन्न व सध्या डिचोलीचा अतिरिक्त ताबा असलेले उपअधिक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर अधिक तपास करीत आहेत. दरम्यान संशयित आरोपी सुनिलकुमार याला डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात सादर केला असता त्याला चार दिवस रिमांडवर घेण्यात आले आहे.