नवी दिल्ली येथे लॉकडाउनचे नियम मोडणाऱया पित्याच्या विरोधात 30 वर्षीय मुलाने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. वसंत कुंज येथील एका युवकाने स्वतःचे वडिल वारंवार लॉकडाउनचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे.
वडिल वारंवार घराबाहेर पडत असल्याने पूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाल्याची तक्रार युवकाने केली आहे. 59 वर्षीय विरेंद्र सिंग रस्त्यांवर फिरत असल्याने पोलिसांनी त्यांना घरातच थांबण्याची सूचना केली होती. पण त्यांनी घराबाहेर पडणे सुरूच ठेवले आहे. पोलिसांनी विरेंद्र सिंग यांना क्वारेंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्याचा इशारा दिल्याने त्यांनी लॉकडाउनचे पालन सुरू केले आहे.