बेळगाव : दहावीत उत्तम गुण घेऊन उच्च शिक्षण घेण्याची मनोकामना असलेल्या विद्यार्थिनीच्या वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे विवंचनेत असलेल्या विद्यार्थिनीला ऍड. शामसुंदर पत्तार यांनी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
ऍड. बसवराज चराटे यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे त्यांची मुलगी भाग्यश्री हिच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे पुढे काय करायचे, असा प्रश्न भाग्यश्रीला पडला. तिच्या मनामध्ये इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा करायचा होता. मात्र पैशांच्या अडचणीमुळे ती निराश झाली.
याची माहिती वकिलांना मिळाली. त्यानंतर ऍड. शामसुंदर पत्तार यांनी तिला शिक्षणासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. बुधवारी तिला धनादेश देण्यात आला.
यावेळी ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. शंकर नावगेकर, ऍड. पट्टण, ऍड. बाळनाईक, ऍड. विशाल चौगुले, ऍड. भगतसिंग रोकडे, ऍड. होनगेकर आदी उपस्थित
होते.