प्रतिनिधी/ वडूज
वडूज नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाचा कौल पुन्हा ङ्गएकदा त्रिशंकू लागला आहे. मागील खेपेप्रमाणेच चार अपक्ष उमेदवार निवडून आल्याने याही खेपेस अपक्षांच्या हाती नगरपंचायतीचे सुकाणू राहणार आहेत. निवडणूकीत राष्ट्रवादीला पाच, भाजपला सहा, काँग्रेसला एक, वंचीत बहुजन आघाडीला एक व अपक्ष चार असे बलाबल झाले आहे. नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यासाठी एकूण 72 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भाजपाच्या विजयी उमेदवारांत जयवंत माधवराव पाटील (प्रभाग 16, 392 मते), बनाजी दिनकर पाटोळे (प्रभाग 9, 222 मते), सौ. रेखा अनिल माळी (प्रभाग 6, 523 मते), सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे (प्रभाग 7, 338 मते), सोमनाथ नारायण जाधव (प्रभाग 8, 399 मते) ओंकार दिलीप चव्हाण (प्रभाग 11, 258 मते) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांमध्ये विद्यमान नगराध्यक्ष सुनिल हिंदुराव गोडसे, (प्रभाग 14, 323 मते), सौ. आरती श्रीकांत काळे (प्रभाग 1, 353 मते), रोशना संजय गोडसे (प्रभाग 15, 207 मते), सौ. स्वप्नाली गणेश गोडसे (प्रभाग 13, 484 मते), सौ. शोभा तानाजी वायदंडे ( प्रभाग 10, 202 मते) यांचा समावेश आहे. प्रभाग 12 मधून काँग्रेसचे अभयकुमार विठ्ठलराव देशमुख ( 137 मते) हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग 5 मधून शोभा दिपक बडेकर (248 मते) यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने चंचू प्रवेश केला आहे. तर सौ. मनिषा रविंद्र काळे (प्रभाग 2, 189 मते), सौ. राधिका गिरीष गोडसे (प्रभाग 3, 292 मते), तसेच सचिन तुकाराम माळी (प्रभाग 17, 460 मते), मनोज रामचंद्र कुंभार (प्रभाग 4, 252 मते) यांचा विजयी उमेदवारांत समावेश आहे. चौकट ः प्रा. बंडा गोडसेंना दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत माजी जि.प. सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवारीसाठी भाजपाची जवळीक साधली होती. मात्र त्याठिकाणी त्यांना काहींचा विरोध झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या सुनबाई राधिका गोडसे यांना अपक्ष मैदानात उतरविले. उचलत्या प्रभागात उमेदवारी घेऊन विजयी झालेले एका विशिष्ट टप्प्यावर प्रा. गोडसेंना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर हिंदुराव अण्णांनी ही आपले सुपूत्र सुनील गोडसे यांना उचलत्या प्रभागात विजयी करून आपली ताकद दाखवून दिली आहे.