प्रयास सामाजीक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी /वडूज
येथील प्रयास सामाजिक विकास संस्थेने गत चार वर्षांपूर्वी विविध वृक्षांची लागवड करून त्याचे योग्य संवर्धन केले आणि त्या वृक्षांचा पाचवा वाढदिवस साजरा करुन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला असून वडूज परिसरातील येरळा नदी काठी वृक्षसंवर्धनामुळे प्रयास सामाजिक संस्थेने कवच निर्माण केले असल्याचे प्रतिपादन माजी सभापती संदीप मांडवे यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर,माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे, मजूर फेडरशनचे संचालक सचिन माळी,प्रयासचे अध्यक्ष डाँ.कुंडलीक मांडवे, उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला, प्रा.सोहन मोहळकर, संतोष देशमाने, जयवंत पाटील, महेश गोडसे,ईश्वर जाधव,रोहीत शहा धनंजय गोडसे ,शुभम ठिगळे , राहुल सरतापे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले की, संस्थेने समाजमन व संभाव्य धोके ओळखून आपले समाजप्रित कार्य अविरत प्रामाणिक सुरू ठेवले आहे.त्यांनी समाजासाठी विविध प्रश्न हाती घेऊन चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्यात वेगळा ठसा उमटवला आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी येरळानदी ( वेदावती ) चे पात्र साफसफाई करून बंधारा बांधण्याच्या कामात मोलाचे सहकार्य केले. गत चार वर्षांपूर्वी याच नदी काठी वृक्षारोपण करून त्या झाडांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली.लोकांच्यात जनजागृती व्हावी यासाठी त्या झाडांचा वाढदिवस साजरा केला. पुढील काळातही त्यांनी असे बरेच उपक्रम हाती घेऊन वडूज व परिसरातील भागांचा कायापालट करावा नगरपंचायत प्रशासनाचे पूर्ण सहकार्य नेहमीच राहील.
याप्रसंगी शशिकांत गोडसे , राजेंद्र दारवटकर, अरविंद शहा, मयुरेश शेटे, प्रयास सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. कुंडलीक मांडवे, सुत्रसंचालन विशाल भागवत यांनी केले तर आभार उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला यांनी मानले.
.. झाडांना सलग चार वर्ष स्वखर्चातून माजी जि.प. सदस्य प्रा. बंडा गोडसे यांच्या माध्यमातून रणजीत गोडसे व मजूर फेडरेशनचे संचालक सचिन माळी यांनी पाणी देऊन झाडांची तहान भागवली.