वार्ताहर/ कास
निसर्ग संपदेने नटलेला पश्चिमेकडील डोंगराळ भाग या डोंगरांगामध्ये घनदाट जंगलासोबतच गवताने भरलेले पठार व डोंगररांगा असुन या परिसरात वणवे लावण्याचे प्रमाण वाढु लागले आहे अनेक डोंगर वणव्यात होरपळुन काळेकुट्ट झाले आहेत मात्र काही ठिकाणी लागलेले वणवे विझवुन वनसंपदा वाचवण्यात कास पठार वनसमीतीच्या कर्मचायांना सोबतच वनविभागाला यश आले असुन काही गावात जनजागृतीमुळेही अदयाप वणवे लागले नसल्याचे दिसुन येत आहे कास पठार वनसमीतीच्या कर्मचायांसोबतच कास च्या वनरक्षक स्नेहल शिंगरे व धावली व परळीच्या वनरक्षक साधना राठोड या दोन्ही वनरागीणींची वणवे विझवण्यासाठी होत असलेली धडपड आणी धावाधाव कौतुकास्पद असुन त्यांचे निसर्गप्रेमीकडुन अभिनंदन होत आहे
अनमोल निसर्ग संपदेचे जतन करणे सर्वांचीच जबाबदारी असतानाही काही विन्घसंतोषी लोकांकडुन वणवे लावुन वनसंपदेची होरपळ करण्यात धन्यता मानली जाते त्यांच्या विन्घसंतोषी पणा मुळे अनेक डोंगररागां पठारे काळेकूट्ट झाली असुन पशु पक्षांसोबतच झाडांची होरपळ झाली आहे मात्र गेल्या चार पाच वर्षात लागलेला वणवा विझवण्याचा जणु काही विढाच कास पठार वनसमितीच्या कर्मचायांनी उचलला असुन रात्री अपरात्री कास पठार परळी बामणोली मेढा भागात कोठेही वणवा लागल्यास कर्मचायांची धावाधाव होताना दिसत असुन प्रसंगी जिव धोक्यात घालुन आगीच्या ज्वाळापुढे दोन हात करत आधुनीक यंत्र व झाडांच्या फांदीने ( ढाळीने )वणवे विझवुन निसर्गाचे जतन केले जात आहे या कर्मचायां जिवघेण्या कसरती व वनविभागाच्या समाप्रबोधनामुळे धावली नावली भांबवली सह अन्य गावांच्या वनक्षेत्रात अद्याप वनवा न लागल्याने वनसंपदा टिकून आहे
वणवा आटोक्यात आणण्यासाठी पठार वन समीतीचे
प्रदीप शिंदे सुजित जांभळे अभिषेक शेलार विजय बादापुरे योगेश काळे आनंद शिंदे संदीप साळुंखे महेश कदम संतोष अटाळे धोंडिराम किर्दत सागर भोसले सिताराम बादापुरे प्रदिप काळे आत्माराम आखाडे अंकुश आहीरे आनंद किर्दत निलेश कदम आदी कर्मचा-यांसोबतच वनरक्षक स्नेहल शिंगरे व साधना राठोड या वनरागीणींची धावाधाव कौतुकास्पद असुन येत्या काळात वाणव्यातुन वाचलेल्या वनक्षेत्राला तरी विन्घसंतोषीनी वणवा लावु नये अशी अपेक्षा या कर्मचायांसोबतच पर्यावरणप्रेमींतुन व्यक्त होत आहे