वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने आपले अग्रस्थान गमविले आहे. या मानांकन यादीत विंडीजची कर्णधार स्टिफेनी टेलरने अग्रस्थान मिळविले आहे.
टेलरने काही दिवसापूर्वी वनडे फलंदाजांच्या मानांकनात अग्रस्थान पटकाविले होते. आता तिने पुन्हा हे स्थान मिळविले आहे तसेच ती अष्टपैलूंच्या मानांकन यादीतही पहिल्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची झुलन गोस्वामी पाचव्या व अष्टपैलूंच्या मानांकन यादीत भारताची दीप्ती शर्मा पाचव्या स्थानावर आहे.