वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या मिताली राजने दुसरे स्थान मिळविले आहे तर स्मृती मानधनाच्या मानांकनात घसरण झाली असून ती आता आठव्या स्थानावर आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. आयसीसी महिलांची वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा न्यूझीलंडमध्ये मार्च महिन्यात खेळविली जाणार आहे.
महिलांच्या वनडे ताज्या फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची हिली 749 मानांकन गुणांसह पहिल्या, भारताची मिताली राज 744 गुणांसह दुसऱया न्यूझीलंडची सॅटरव्हेट 729 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रेलियाची मुनी चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या बेट्सने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात आपले 11 वे शतक नोंदवून सामनावीराचा बहुमान मिळविल्याने तिने तब्बल सहा महिन्यानंतर आयसीसीच्या फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या 20 फलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे. आता ती 17 व्या स्थानावर राहील. बेमाँट आणि लेनिंगअनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
आयसीसीच्या महिलांच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडची इक्लेस्टोन दुसऱया स्थानावर आहे. वनडे आणि टी-20 प्रकारातील गोलंदाजांच्या मानांकन यादीत इक्लेस्टोनने दुसरे स्थान मिळविले आहे. टी-20 गोलंदाजांच्या मानाकंन यादीत भारताची शेफाली वर्मा तिसऱया स्थानावर आहे. न्यूझीलंडची ऍमिलिया केर आठव्या स्थानावर आहे. लेनिंगने पहिले स्थान तर मुनीने दुसरे स्थान घेतले आहे.