वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तब्बल 24 वर्षांनंतर पाकचा दौरा करीत आहे. सध्या या दोन संघामध्ये कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेनंतर होणाऱया वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन दुखापतीमुळे उपलब्ध होवू शकणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. या वनडे मालिकेसाठी आता रिचर्डसनच्या जागी नवोदित बेन ड्वरशुइसचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. या वनडे मालिकेसाठी मिशेल स्टार्क, हॅजलवूड आणि कर्णधार कमिन्स उपलब्ध राहणार नाहीत.
ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर एकमेव टी-20 सामना लाहोरमध्ये 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान आयोजित केला आहे. जेसन बेहरेनडॉर्फ, ऍबॉट, इलीस आणि ड्वारशुइस यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील.