वृत्तसंस्था/ क्विन्सटाऊन
यजमान न्यूझीलंड आणि भारत महिला क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने विजयी सलामी देताना शनिवारच्या सामन्यात भारताचा 62 धावांनी पराभव केला. न्यूझीलंड संघातील सलामीची फलंदाज सुझी बेट्सने शानदार शतक (106) झळकविले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव 48.1 षटकांत 275 धावांत आटोपला. त्यानंतर भारताचा डाव 49.4 षटकांत 213 धावांत समाप्त झाल्याने भारताला या मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या बेट्सने 106, ऍमिलिया केरने 33, सॅटरवेटने 63, ग्रीनने 17, डिव्हाईनने 13 धावा जमविल्या. भारतातर्फे झुलन गोस्वामी, पुजा वस्त्रsकर, राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर पुनम यादवने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये कर्णधार मिथाली राजने 73 चेंडूत 59, शेफाली वर्माने 12, यास्तिका भाटियाने 41, हरमनप्रित कौरने 10, रिचा घोशने 22, दीप्ती शर्माने 16, पुजा वस्त्रsकरने 23, झुलन गोस्वामीने नाबाद 13 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे जेस केर सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 35 धावांत 4 तर जेनसेनने 36 धावांत 2 आणि तेहुहु, डिव्हेनी, रो आणि ऍमिलिया केर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 48.1 षटकांत सर्व बाद 275 (बेट्स 106, ग्रीन 17, ऍमिलिया केर 33, सॅटरवेट 63, डिव्हाईन 13, गोस्वामी, वस्त्रsकर, गायकवाड, दिप्ती शर्मा प्रत्येकी दोन बळी, पूनम यादव 1 बळी), भारत 49.4 षटकात- सर्वबाद 213 (मिथाली राज 59, यष्टीका भाटिया 41, शेफाली वर्मा 12, मेघना 4, हरमनप्रीत कौर 10, रिचा घोश 22, दीप्ती शर्मा 16, पुजा वस्त्रsकर 23, गोस्वामी नाबाद 13, जेस केर 4-35, जेनसेन 2-36, तेहुहु, डेव्हिनी, रो आणि ऍमिलिया केर प्रत्येकी एक बळी).