केएल राहुल, विराट, कृणालची अर्धशतके, पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाचे 54 धावात 4 बळी
शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, कृणाल पंडय़ा यांची तडफदार अर्धशतके व पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा, कृणाल पंडय़ा तसेच शार्दुल ठाकुर यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने येथील पहिल्या वनडे सामन्यात विद्यमान विश्वविजेत्या इंग्लंडचा 66 धावांनी धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने या लढतीत प्रारंभी 5 बाद 317 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 42.1 षटकात सर्वबाद 251 धावांवरच आटोपला.
विजयासाठी 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो (66 चेंडूत 94) व जेसॉन रॉय (35 चेंडूत 46) यांनी 14.2 षटकातच 135 धावांची आतषबाजी करत जणू विजयाची भक्कम पायाभरणी केली होती. पण, पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने जेसॉन रॉयला तर बेअरस्टोला शार्दुल ठाकुरने बाद केल्यानंतर इंग्लंडचा संघ बॅकफूटवर आला. रॉय व बेअरस्टो हे दोन्ही सलामीवीर अवघ्या दोन धावांच्या अंतरात बाद झाले. त्यानंतर इंग्लंडच्या पदरी निराशा आली.
तिसऱया स्थानावरील बेन स्टोक्सने प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर बदली खेळाडू शुभमनकडे झेल दिला तर मॉर्गन शार्दुलच्या गोलंदाजीवर राहुलकडे झेल देत बाद झाला. त्याने 30 चेंडूत 22 धावा केल्या. या सलग पडझडीमुळे बिनबाद 134 वरुन इंग्लंडची 4 बाद 175 अशी बिकट स्थिती झाली. त्यातच बटलर अंपायर्स कॉलच्या सदोष नियमाचा बळी ठरल्यानंतर इंग्लंडची स्थिती 5 बाद 176 अशी झाली आणि यानंतर ते यातून अजिबात सावरु शकले नाहीत. भारतीय संघातर्फे पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने 54 धावात 4 बळी घेतले तर शार्दुलने 37 धावात 3 व भुवनेश्वरने 30 धावात 2 फलंदाजांना बाद केले. आणखी एक पदार्पणवीर कृणाल पंडय़ानेही 59 धावात 1 गडी बाद केला. श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने त्याने मैदान सोडले होते. तो आता उर्वरित मालिकेतून व नंतर होणाऱया आयपीएलमध्येही खेळू शकणार नाही, असे सांगण्यात आले.
इंग्लंड ः जेसॉन रॉय झे. बदली खेळाडू (सूर्यकुमार), गो. प्रसिद्ध कृष्णा 46 (35 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), जॉनी बेअरस्टो झे. कुलदीप, गो. शार्दुल 94 (66 चेंडूत 6 चौकार, 7 षटकार), बेन स्टोक्स झे. बदली खेळाडू (शुभमन), गो. प्रसिद्ध कृष्णा 1 (11 चेंडू), इयॉन मॉर्गन झे. राहुल, गो. शार्दुल 22 (30 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), जोस बटलर पायचीत गो. शार्दुल 2 (4 चेंडू), सॅम बिलिंग्ज झे. कोहली, गो. प्रसिद्ध कृष्णा 18 (22 चेंडूत 1 षटकार), मोईन अली झे. राहुल, गो. कुमार 30 (37 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), सॅम करण झे. बदली खेळाडू (शुभमन), गो. कृणाल 12 (20 चेंडूत 1 चौकार), टॉम करण झे. कुमार, गो. प्रसिद्ध कृष्णा 11 (16 चेंडूत 1 चौकार), अदिल रशिद झे. राहुल, गो. कुमार 0 (5 चेंडू), मार्क वूड नाबाद 2 (7 चेंडू). अवांतर 13. एकूण 42.1 षटकात सर्वबाद 251.
गडी बाद होण्याचा क्रम
1-135 (जेसॉन, 14.2), 2-137 (स्टोक्स, 16.2), 3-169 (बेअरस्टो, 22.1), 4-175 (मॉर्गन, 24.1), 5-176 (बटलर, 24.4), 6-217 (बिलिंग्ज, 32.1), 7-237 (मोईन, 37.1), 8-239 (सॅम, 38.1), 9-241 (अदिल, 39.2), 10-251 (टॉम, 42.1).
गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार 9-0-30-2, प्रसिद्ध कृष्णा 8.1-1-54-4, शार्दुल ठाकुर 6-0-37-3, कृणाल पंडय़ा 10-0-59-1, कुलदीप यादव 9-0-68-0.