वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनची टेक कंपनी वनप्लसकडून युरोपमध्ये झालेल्या ऑनलाईनच्या कार्यक्रमात दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो यांचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये लेटेस्ट आणि अत्याधुनिक सुविधा असल्याचेही सांगितले आहे तर सोबत शक्तिशाली पॉवरफूल्ल स्नॅपडॅगन 865 प्रोसेसरची जोड आहे. फोनमध्ये 30 वॉट वायर्ड चार्जिंग आणि 5 जी नेटवर्क सपोर्टची सुविधा दोन्ही मॉडेलना मिळणार आहे. वनप्लसचे हेडफोन वायरलेस झेडचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले आहे.
फिचर
- 6.55 इंचाचा एमोलेड डिस्प्ले
- 3 डी कॉर्निग गोरिला ग्लास
- इन डिप्ले फिंगरप्रिंट सेंसर
- 8 जीबी व 12 जीबी रॅम
- 128 जीबी व 265 जीबी स्टोरेज