रायबागजवळील घटना : कर्मचारी जखमी
प्रतिनिधी / बेळगाव
गक्याने वनविभागाच्या दोन कर्मचाऱयांवर हल्ला करण्याची घटना रायबागजवळ घडली आहे. या हल्ल्यात कर्मचारी जखमी झाले आहेत. नुकतीच ही घटना एका उसाच्या शिवारात घडली आहे. त्यामुळे शेतकऱयांनी जागरुक राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
वाढत्या उन्हामुळे वन्यप्राणी सैरभैर होत आहेत. दरम्यान, अनेक रस्त्यांवर व शिवारात वन्यप्राण्यांचे दर्शन होत आहे. रायबागजवळील शिवारात शेतकऱयांना गव्याचे दर्शन झाले. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. मात्र, उसाच्या शेतीत असणाऱया गव्यांनी अचानक कर्मचाऱयांवर हल्ला चढविला. यामध्ये कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी कर्मचाऱयांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डीएफओ ऍन्थोनी ए. यांनी दिली.