प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील आंबेदरेत विना परवाना लाकडाची वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यांनी छापा टाकून तीन वाहने व लाकुड असा सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. दोन जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांना मिळालेल्या माहितीवरुन आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने सापळा लावला. त्यावेळी लाकडाची विनापरवाना वाहतूक करणारे दोघे जण जाळय़ात सापडले. ट्रक्टर क्रमांक एमएच11जी4543 ट्रॉली क्र. एएच11आर670 तर पिकअप एमएच11टी2564 यास लाकूड असा सुमारे 8 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. प्रल्हाद वसंतराव शेडगे रा. शाहुपूरी, बाजीराव प्रकाश लोंढें रा. आकाशवाणी झोपडपट्टी या दोघांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी भरारी पथकाचे सचिन डोंबाळे, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, वनपाल दीपक गायकवाड, पो. कॉ. राजेश वीरकर, सुहास पवार, वनरक्षक विजय भोसले, डोंगा ओंकार ढाले यांनी केली.