सातारा / प्रतिनिधी :
मागील काही वर्षे रखडलेल्या वनविभाच्या पदोन्नती अखेर मार्गी लागल्या आहेत. सातारा जिल्हय़ातील वनविभागाच्या तीन मुख्यअधिकाऱ्यांची पदोन्नती होऊन त्यांची इतर जिल्हय़ात बदली करण्यात आली आहे. सातारा वनअधिकारी शितल राठोड यांची सहाय्यक वनसंरक्षक मुल्याकन विभाग पदी बढती करण्यात आली असुन, त्या पुणे येथील वनविभात आपला कार्यभार सांभाळणार आहेत.
त्याचबरोबर पाटणचे वनाधिकारी विलास काळे यांची सामाजिक वनिकरण सांगली, येथे सहाय्यक वनसंरक्षक (एसी.एफ) म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. वाईचे वनसंरक्षक अधिकारी महेश झांझुर्णे यांची सहाय्यक वनसंरक्षक वनिकरण सातारा येथे पदोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारात शितल राठोड यांच्या जागी महेश झांझुर्णे हे पदभार स्विकारणार आहे. याचबरोबर वनविभागातील इतर कर्मचाऱ्यांचीही पदोन्नती व बदली करण्यात येणार आहे. तसेच वनविभागात रिक्त असलेल्या जागांवर येत्या 10 ऑगस्टपर्यंत नुतन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. मागील काही वर्ष रखडलेल्या पदोन्नतींना गती मिळल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आता रिक्त असलेल्या जागांवर कोण अधिकारी येणार तसेच वनविभगात सध्या झालेल्या खांदापालटाची चर्चा सर्वत्र होत आहे.