मुख्यमंत्री पदकाने पहिल्या महिला वनाधिकाऱयांचा होणार सन्मान
बेळगाव / प्रनिनिधी
सौंदत्ती येथील वनविभागाच्या आरएफओ सुनीता निंबरगी यांना मुख्यमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. हे पदक स्वीकारणाऱया कर्नाटकातील त्या पहिल्या महिला वनाधिकारी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय व वृक्ष लागवडीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी बेळगावमध्येही वनाधिकारी पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.