प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. अशा संकट काळात अनेकजण मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱयांनी देखील शहरातील अशा गरजू झोपडपट्टीवासियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.
सामाजिक वनविभागाचे उपवन संरक्षणाधिकारी एस. के. कल्लोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कणबर्गी, किल्ला तलाव, बॉक्साईट रोड, श्रीनगर, वंटमुरी, मच्छे रोड, गणेशपूर आदी ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासियांना जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी संरक्षणाधिकारी एस. के. कल्लोळकर म्हणाले, लॉकडाऊन काळात अनेकांना अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशापर्यंत जीवनावश्यक साहित्यांचे किट वाटप केले जात आहे. या प्रसंगी एसीएफ वसीमराजा तेनगी, उपशाखा अधिकारी आर. व्ही. मुरारी, एस. एम. नायक, डी. आर. हरजी, एस. व्ही. गार्डगळाद, एस. एस. जकाती आदी उपस्थित होते.