प्रतिनिधी /पणजी
बेतकी येथील वनिता वि. फडते यांनी लिहिलेल्या ‘चला गो सयानो धालो फुगडी खेळूया’ या कविता संग्रहाचे प्रकाशन दि. 12 रोजी बेतकी येथे पार पडले. प्रकाशन सोहळ्याला बेतकी खांडोळा ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने हजर होते. इतर प्रमुख अतिथीमध्ये गणेश अ. सावईकर, साहित्यिक आर. बी. फडते, पंच- कनक सावंत, सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नमिता कांबळे हजर होत्या. मान्यवरांनी कवियत्रीला शाबासकी देताना साहित्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कु. गौरवी नाईक आणि सुलक्षा नाईक यांनी या संग्रहातील काही कविता गाऊन सादर केल्या. पुस्तकाची कवियत्री वनिता वि. फडते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते या नात्याने गोविंद भगत यांनी या पुस्तकावर, त्यातील कवितावर तसेच कवियत्रीच्या लेखन शैलीवर विस्तृत विवेचन केले.
आर.बी. फडते यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल रा. फडते. यांनी उपस्थितांचे आबार मानले. कु.दिया नाईक हिने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगली उपस्थिती होती. लोकगीत संग्रहाचे प्रकाशन करताना सरपंच दिलीप नाईक, ज्येष्ठ साहित्यिक आर.बी. फडते, पंच कनक सावंत, प्राध्यापक गोविंद भगत, गणेश सावईकर, विश्वनाथ फडते, मुख्याध्यापक नमिका कांबळी व दिव्या नाईक.