1 हजार कोटी गुंतवणार: 8 हजार स्टोअर्सचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोबाइल क्षेत्रातील चिनी कंपनी वन प्लस भारतामध्ये संशोधन आणि विकास प्रकल्पासाठी 1 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिनी कंपन्यांना भारतात विरोध होत असला तरी वन प्लसने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीची 5000 हून अधिक ऑफलाइन स्टोअर्स असून ही संख्या येणाऱया काळामध्ये 8 हजारपर्यंत नेण्याची योजना कंपनीने आखली आहे. पुढील वर्षापासून कंपनी यु आणि क्मयू सिरीजमधील टीव्हींचे उत्पादन भारतामध्ये घेणार आहे.
मेक इन इंडियाच्या अंतर्गत वन प्लसला आपली योजना भारतात विस्तारायची आहे. या अंतर्गतच कंपनी सध्या स्मार्टफोनची निर्मिती भारतात करते आहे. वन प्लसचे सर्वात मोठे स्टोअर येणाऱया काही दिवसात हैदराबादमध्ये सुरू केले जाणार असल्याचे कंपनीने सांगून येणाऱया काळात म्हणजेच 6 महिन्यांमध्ये 14 स्टोअर्सची सुरुवात केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्या 65 शहरांमध्ये असलेला विस्तार कंपनीला 100 शहरांमध्ये आगामी काळात करायचा आहे. स्मार्टफोन्सलाही भारतात बऱयापैकी प्रतिसाद मिळत असून यातील विक्री केंद्रांचा विस्तार लवकरच केला जाणार आहे. रिटेल क्षेत्राच्या विकास, विस्तारासाठी कंपनी आणखी 100 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचेही समजते