मुलीचा दर 3 महिन्यांनी रक्तचाचणीद्वारे ठरतो डायट, धोनीसोबत चित्रित केली आहे जाहिरात
जोधपूरची ऍथलिट पूजा विश्नोईने टीव्हीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 10 वर्षीय पूजाने आतापर्यंत अनेक दिग्गज कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. पूजाने वयाच्या 7 व्या वर्षीच सिक्स पॅक एब्स तयार करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ती विराट कोहली फौंडेशनची सदस्य आहे. अलिकडेच तिने महेंद्र सिंह धोनीसोबत एका जाहिरातीचे चित्रिकरण केले आहे.
पूजा वयाच्या 5 व्या वर्षीच क्रीडाक्षेत्राशी जोडली गेली होती. पूजाला क्रिकेट खेळणे आवडते. विराट कोहली फौंडेशन पूजाच्या क्रीडाविकास आणि डायटची काळजी घेते. पूजाचा डायट देखील कॅफे न्यूट्रीशन ठरवते. दर तीन महिन्यांनी तिची रक्त चाचणी होते आणि त्यानुसारच तिला डायट दिला जातो.
पहाटे 3 वाजल्यापासून वर्कआउट
पूजा दररोज पहाटे 3 वाजता उठते, त्यांनतर ती वर्कआउटला प्रारंभ करते. इयत्ता 5 वीत शिकणाऱया पूजाचा बहुतांश दिवस वर्कआउट आणि सरावात जातो. पहाटे 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत रनिंग, वर्कआउट आणि ऑनलाईन क्लास अटेंड करते. शाळेचा गृहपाठ संपल्यावर संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत वर्कआउट राहतो.
सुवर्णपदकाचा ध्यास
2024 मध्ये होणाऱया युथ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे. 2019 मध्ये आयोजित इंडियन स्पोर्ट्स ऑनरमध्ये तिने 100 मीटरच्या शर्यतीत यश मिळविले होते. पूजाने आतापर्यंत अनेक मोठय़ा कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. पण पूजाला याकरता बराच त्यागही करावा लागला आहे. तिने मागील 7 वर्षांमध्ये एकदाही आइस्क्रीम खाल्लेले नाही.