ऑनलाईन टीम / रायगड :
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत आहे. या उत्साहाच्या वातावरणातच शिवज्योत आणण्यासाठी रायगडकडे येणाऱ्या शिवप्रेमींची दुचाकी महाड आणि भोर दरम्यानच्या वरंध घाटात कोसळली. दोघांना दरीतून बाहेर काढण्यात आले असून, एकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर येथील तीन तरुण शिवज्योत घेण्यासाठी रायगडाकडे निघाले होते. ते तिघेही वरंध घाटात आले असता त्यांचे मोटार सायकलवरील नियंत्रण सुटले आणि ते तिघेही मोटर सायकलसह दरीत कोसळले. महाड एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ बचावकार्य हाती घेत दोघांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र, तिसऱ्या तरुणाचा अद्याप शोध सुरु आहे.