दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
श्रीनगर / वृत्तसंस्था
सुरक्षा दलांनी सोमवारी श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. ठार झालेले दोन्ही दहशतवादी टीआरएफचे असून त्यांच्यामध्ये एक सर्वोच्च कमांडर होता. दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. शेख अब्बास आणि साकीव मंजूर अशी दोघांची नावे आहेत. दोघेही दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेले असल्यामुळे ते सुरक्षा दलाच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गेल्या वषी पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीत दोन्ही दहशतवाद्यांचा समावेश होता.
अलुची बाग परिसरात काही दहशतवादी सुरक्षा दलांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू करताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण दहशतवाद्यांनी गोळीबार करताच चकमक सुरू झाली. संघर्षादरम्यान दोन्ही दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले.
चकमकीत खात्मा झालेला दहशतवादी शेख अब्बास हा मूळचा कुलगाम जिह्यातील आहे. तो बऱयाच वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला होता. तो सुमारे तीस वर्षे दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. तो अनेक वेळा चकमकीदरम्यान सुरक्षा दलांच्या हातून पळून जाण्यात यशस्वी झाला, पण सोमवारी त्याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली. त्यात दोघांची नावे होती.