वादग्रस्त टिप्पणीसंबंधी नाराजी व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या आयटम या टिप्पणीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कमलनाथ पक्षाचे नेते असले तरीही त्यांनी वापरलेली भाषा अयोग्य होती, असे राहुल यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांचे विधान समोर आल्यावर ही कमलनाथ यांनी याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे. कुठल्या संदर्भाने टिप्पणी केली होती हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाचा अपमान करण्याचा उद्देशच नव्हता मग मी का माफी मागू? कुणाला अपमानित वाटत असल्यास मी खेद व्यक्त केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कमलानाथ यांनी प्रचारसभेत बोलताना मध्यप्रदेशच्या महिला मंत्री इमरती देवी यांना आयटम संबोधिले होते. कमलनाथ यांच्या या टिप्पणीनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जोरदार टीका केली होती.