महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
प्रतिनिधी / औंध
20 आणि 21 फेब्रुवारी रोजी पगवारा ( पंजाब ) येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी आज झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीतून महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
करोनाच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्व. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र ( कात्रज ) येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.
परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, तांत्रिक समितीचे सचिव प्रा. बंकट यादव, कार्यालीन सचिव ललित लांडगे यांच्या उपस्थितीत चाचणी पार पडली.
स्पर्धेतून निवडलेला महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे
५५ किलोअभिजित पाटील,
६० किलो सद्दाम शेख ,६३ किलो गोविंद यादव, ६७ किलो प्रीतम खोत ,७२ किलो समीर पाटील, ७७ किलो शिवाजी पाटील ,८२ किलो तानाजी वीरकर ,८७ किलो अमोल मुंढे ,९७ किलो शैलेश शेळके ,१३० किलो हर्षवर्धन सदगीर