लेगस्पिनर वरुण चक्रवर्ती तंदुरुस्ती चाचणी पार करु शकलेला नसून यामुळे इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याला खेळता येणार नाही, असे बुधवारी स्पष्ट झाले. दुसरीकडे, टी. नटराजन खांद्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी झगडत असून पहिल्या काही सामन्यात तो खेळू शकणार नाही, अशीही शक्यता आहे. आणखी एक युवा खेळाडू राहुल तेवातिया भारतीय संघासमवेत अहमदाबादमध्ये सराव करत असून त्याच्या दुसऱया तंदुरुस्ती चाचणीचा निकाल येणे बाकी आहे. भारत-इंग्लंड यांच्यात 5 टी-20 सामन्यानंतर पुण्यात 3 सामन्यांची वनडे मालिकाही होणार आहे.
Previous Articleआजचे भविष्य गुरुवार दि. 11 मार्च 2021
Next Article अचंता शरथ कमलची आगेकूच
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.