आयटी कंपन्या काळजीत : विविध स्तरामधून माहिती येतेय समोर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रिमोट क्षेत्रात कार्यरत असणाऱया आयटी कंपन्यांना एका वेगळय़ाच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सदरच्या कर्मचाऱयांकडून एकाच वेळी एकपेक्षा अधिक कंपन्यांमध्ये काम केले जात असल्याची बाब समोर आली आहे. यात पूर्णवेळ काम करणारे टेक प्रोफेशनल्स साईट प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. याची कंपन्यांना चिंता लागली असून यामुळे उत्पन्न व उत्पादनामध्ये नुकसान होत आहे. कर्मचारी हे एकाचवेळी दोन्ही कंपन्यांमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. यामुळे आगामी काळात ‘वर्क फ्रॉम होम’मधील कर्मचाऱयांना लवकरच पुन्हा कार्यालयात बोलविण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
बिर्लासॉफ्टचे सीईओ आणि नोएडासाठी नॅसकॉमचे क्षेत्रीय परिषदेचे अध्यक्ष धर्मेद्र कपूर यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती सात कंपन्यांसाठी समांतर रुपाने काम करत राहिला होता.
माहिती मिळवण्याचा प्रयत्न
लॉ फर्म निशीथ देसाई असोसिएटसमध्ये एचआर लॉ प्रॅक्टिसचे प्रमुख विक्रम श्रॉफ म्हणतात की, भारतामध्ये सेंट्रलाइज्ड डाटाबेस नाही आहे. तसेच नियुक्तींची माहितीही समोर येत नाही. याकरीता येत्या काही काळात कर्मचाऱयांना अन्य स्रोतांमधून काही वेतन येते का नाही याची माहिती घेण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.