विजापूर जिल्हा पोलीस प्रमुखपदी आनंदकुमार
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्य सरकारने बुधवारी तीन आयपीएस आणि दोन आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. विजापूर जिल्हा पोलीस प्रमुख अनुपम अगरवाल यांची बदली करण्यात आली असून या जागी एच. डी. आनंदकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर कारवार जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रकाश देवराजू यांची बदली करण्यात आली असून तेथे वर्तिका कटियार यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या कारवार जिल्हय़ाच्या पहिल्या महिला जिल्हा पोलीस प्रमुख ठरल्या आहेत.
जी. संगीता यांची चामराजनगर जिल्हा पोलीस प्रमुखपदी बदली करण्यात आली आहे. या जागेवरील दिव्या सारा थॉमस यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
बेंगळूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. (बीएमआरसीएल) चे व्यवस्थापकीय संचालक राकेश सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अंजुम परवेझ यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर बागायत आणि रेशीम खात्याचे मुख्य सचिव राजेंद्रकुमार कटारिया यांची परिवहन खात्याच्या मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. हे पद याआधी अंजुम परवेझ यांच्याकडे होते.