रामदेव हॉटेलशेजारी पादचारी पडण्याचा धोका
बेळगाव : स्मार्ट सिटी बनविण्यासाठी आटापिटा केला जात आहे. नवनवीन योजना राबवून विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना धोका बनला आहे. रामदेव हॉटेलशेजारी असलेल्या डेनेज चेंबरवरील झाकण व्यवस्थित बंद करण्यात आले नाही. त्यामुळे वाहनधारकांना धोका बनला आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. डेनेज चेंबरवरील झाकण गायब झाल्याने दुसऱया चेंबरचे झाकण या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मात्र ते व्यवस्थित बंद करण्यात आले नसल्याने चेंबर उघडेच आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने नेहमी वाहनांची आणि पादचाऱयांची गर्दी होत असते. तसेच या परिसरातील खासगी प्रवासी बस थांबत असतात. तसेच हॉटेलची संख्या जास्त असल्याने नागरिकांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. काही वेळा या मार्गावरील पथदीप देखील बंद असतात. त्यामुळे उघडे असलेले हे चेंबर वाहनधारकांना आणि पादचाऱयांना धोकादायक बनले आहेत. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी आटापिटा केला जातो. पण देखभालीअभावी स्मार्ट सिटीच्या वाटचालीत खंड पडत आहे. त्यामुळे धोकादायक चेंबर व्यवस्थित बंद करण्यासाठी मनपा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.