ऑनलाईन टीम / वर्धा :
सुरतमध्ये अडकलेल्या मजुरांना ओडिशाला घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे आज पहाटे पलटी झाली. या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत. या मजुरांना जखमी अवस्थेत सोडून बस चालक आणि क्लिनर तेथून फरार झाले आहेत.
कोरोनामुळे परराज्यात अडकून पडलेल्या मजुरांना परवाना घेऊन गावी परतण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार हे मजूर गावी निघाले होते. या बसमधून 50 प्रवासी प्रवास करत होते. आज पहाटे ही बसवर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे असताना रस्त्यावरील एका वन्य प्राण्याला वाचवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस वेगात उलटली.
बस उलटचाच बस चालक आणि क्लिनर जखमी मजुरांना सोडून तेथून पसार झाले. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या तीन मजुरांना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारंजा पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.