वृत्तसंस्था/ मुंबई
संयुक्त अरब अमिरात व ओमान येथे होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडू नव्या जर्सीमध्ये दिसणार असून त्याचे अनावरण 13 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केले.
या जर्सीचे अनावरण एमपीएल स्पोर्ट्सतर्फे करण्यात येणार आहे. 2023 पर्यंत तेच भारतीय संघाच्या अधिकृत किटचे पुरस्कर्ते आहेत. नेव्ही ब्ल्यू रंगाच्या याआधीच्या जर्सीमध्ये आता बदल करण्यात येणार असून ब्ल्यू, ग्रीन, व्हाईट व रेड कलरच्या स्ट्रिप्स त्यावर दिसणार आहेत. 1992 वर्ल्ड कपमधील किटवरून प्रेरणा घेत हा नवा किट तयार करण्यात आला आहे.