बेळगाव / प्रतिनिधी
अमेरिका येथे होणाऱया वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिपसाठी बेळगावमधील दोन डान्सर्सना आमंत्रित करण्यात आले आहे. महेश जाधव व प्रेरणा गोनबरे यांना आमंत्रणाचे पत्र आले असून ते अमेरिका येथे भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. जागतिक स्तरावरील एक डान्स स्पर्धा म्हणून वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिपची ओळख आहे. जगभरातील निवडक स्पर्धकांना स्पर्धेसाठी आमंत्रण देण्यात येते. यावषी दि. 25 ते 29 नोव्हेंबरदरम्यान ओलान्डो येथे स्पर्धा होणार आहे. यापूर्वी या दोघांनी स्पेन, दुबई व बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला होता. याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.