वृत्तसंस्था/ लॉसेन, स्वित्झर्लंड
कोव्हिड 19 मुळे निर्माण झालेल्या जगभरातील अनिश्चित परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने एफआयएच वर्ल्ड हॉकी फाईव्ज स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ल्ड हॉकी फाईव्ज स्पर्धेची पहिली आवृत्ती लॉसेनमध्येच येत्या सप्टेंबरमध्ये घेण्याचे ठरले होते. पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे पुढील वर्षापर्यंत ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. ‘या स्पर्धेमुळे हॉकी फाईव्जला जगभरात लोकप्रियता मिळणार होती. पण परिस्थितीचा विचार करून पुढील वर्षापर्यंत ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय आम्हाला नाईलाजाने घ्यावा लागला आहे. पुढील वर्षी याच जोमाने त्याचे आयोजन केले जाईल,’ असे एफआयएच सीईओ थिएरी वेइल म्हणाले. पुरुष व महिलांसाठी असणाऱया या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण वॉच डॉट हॉकीवर केले जाणार आहे.