राजस्थानच्या पुरखारामला अनोखा आजार
पश्चिम राजस्थानच्या नागौर जिल्हय़ातील एक व्यक्ती वर्षातील 300 दिवसांपर्यंत झोपून असतो. त्याच्या जेवणापासून स्नानापर्यंत सर्वकाही झोपेतच पार पडते. वाचताना विचित्र वाटत असले तरीही 42 वर्षीय पुरखाराम विचित्र आजाराने त्रस्त आहे. एक्सिस हायपरसोम्नियाचा आजार त्याला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. असा आजार फारच कमी लोकांना होतो, हा मानसिक आजार आहे. पुरखाराम एकदा झोपी गेल्यावर 25 दिवसांपर्यंत जागा होत नाही. या आजाराची सुरुवात 23 वर्षांपूर्वी झाली होती. झोपेच्या आजाराने ग्रस्त या व्यक्तीला ग्रामस्थ ‘पुंभकर्ण’ म्हणत आहेत.
पुरखारामचे किराणा दुकान आहे. हे दुकान देखील तो महिन्यात 5 दिवसच उघडू शकते. पुरखाराम पूर्वी 5-6 तास झोपी जायचा. पण हे प्रमाण हळूहळू वाढत गेले. पुरखारामला अन्य कुठलाच त्रास नाही. 2015 पासून आजाराचे स्वरुप मोठे झाले आहे. उपाशी असताना झोप येत नसल्याचे पुरखाराम सांगतात.
प्रदीर्घ झोपेविषयी आधीच कळते, एक दिवसापूर्वी डोकेदुखी सुरु होते. झोपल्यानंतर मला उठविणे अशक्य होऊन बसते. कुटुंबीय झोपेतच अन्न भरवतात. बाथरुममध्ये जाण्याची गरज भासल्यावर पुरखाराम अस्वस्थ होतो, त्यानंतर कुटुंबीय त्याला उचलून बाथरुममध्ये नेतात.