ऑनलाईन टीम / गुजरात :
गुजरातमध्ये वलसाडमधील वापी मध्ये असणाऱ्या बायोकेमिकल कंपनीला शनिवारी भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल 8 गाड्या पोहोचल्या आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
आग लागली त्यावेळी कारखान्यात किती लोकं उपस्थित होते, या आगी मागचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप कळू शकलेले नाही.
दरम्यान, याआधी मे महिन्यात देखील सिल्वासामध्ये अशा प्रकारची आग लागली होती. ही आग साधारण रात्री दहाच्या सुमारास लागली होती. आग एवढी मोठी होती की, काही काळातच पूर्ण कारखान्यात पसरली आणि त्यामुळे कारखान्यातील रसायन भरलेल्या ड्रममध्ये स्फोट होऊ लागले होते.